पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : दिवसेंदिवस महागाई वाटत जात आहे आणि उत्पन्न मात्र तसेच आहे. सर्वसामान्य जनतेला याचा फटका सणासुदीला मोठ्या प्रमाणात बसत आहे. महागाईने त्रस्त सामान्य माणसाला दिवाळी कशी साजरी करायची याचा प्रश्नच आहे. कामोठेकरांना महागाई पासून थोडासा दिलासा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, कामोठे आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्त्वावर उत्तम प्रतीची एक किलो साखर, अर्धा किलो रवा आणि मैदा फक्त ९५ रु. देण्यात येत आहे.
सदर विक्री शेतकरी कामगार पक्ष कार्यालय, श्री दत्त निवास, सेक्टर 10, कामोठे येथे होत असून रहिवाशी देखील त्यास चांगला प्रतिसाद देत आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी मा. नगरसेवक प्रमोद म्हात्रे, शंकर म्हात्रे, शहर अध्यक्ष अमोल शितोळे, उपाध्यक्ष नितीन पगारे, कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, संघटक अल्पेश माने, व्या. असो. अध्यक्ष सुरेश खरात, महिला अध्यक्षा उषा झणझणे, महिला कार्याध्यक्षा शुभांगी खरात, शुभांगी कड, कुणाल भेंडे, विश्वास भगत, मधुकर सुरते, नाना भगत, पंडित गोवारी, रमेश गोरे सुनील भेंडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत.
रविवार दिनांक 5 ते 8 नोव्हेंबर या दिवशी सकाळी 10.00 ते 1.00 आणि सायंकाळी 5.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत विक्री सुरू राहील अशी माहिती कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी दिली.
Tags
पनवेल