भाजप कार्यकर्त्यांच्या कार्याचा सुगंध दरवाळावा - लोकनेते रामशेठ ठाकूर


भाजप कार्यकर्त्यांच्या कार्याचा सुगंध दरवाळावा - लोकनेते रामशेठ ठाकूर 
केदार भगत यांच्या उटणे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ 
पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : भाजप कार्यकर्ते ज्या पद्धतीने कामे करीत आहेत त्यांच्या कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या वतीने आयोजित उताणे वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बोल्ट होते. यावेळी माजी नगरसेविका दर्शन भोईर, माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, नीता माळी , शेषनाथ गायकर, योगेश साळवी, संतोष वर्तले, भावेश शिंदे आदी उपस्थित होते.               यापुढे बोलताना रामशेठ ठाकूर म्हणाले की , भाजपचे कार्यकर्ते पक्षाचा आदेश येईल तेव्हा सामाजिक कार्य करीत नाही तर स्वयंस्फूर्तीने कामे करीत असतात. आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने त्यांची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे.भाजप हा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार पक्ष नाही त्यामुळे कार्यकर्त्यांचा कामाचा सुगंध सर्वत्र पसरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले. 


थोडे नवीन जरा जुने