पनवेल दि. ०६ ( संजय कदम ) : पनवेल शहर पोलिसांनी दोन आरोपीना जेरबंद करून त्यांच्या कडून ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत .
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी सह इतर गुन्हे घडल्याच्या तक्रारी दाखल होताच पो. उप आयुक्त परि 02, पंकज डहाणे व सहा. पो. आयुक्त पनवेल विभाग, अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणे कडील वपोनि नितीन ठाकरे,पोनि (गुन्हे) अंजुम बागवान व पोनि (प्रशा) प्रविण भगत यांच्या आदेशाने पनवेल शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उप.नि. अभयसिंह शिंदे, पोहवा नितीन वाघमारे, पोहवा परेश म्हात्रे, पोना रविंद्र पारधी, पोना विनोद देशमुख, पोशि प्रसाद घरत, पोशि नितीन कांबळे,पोशि साईनाथ मोकल यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे अटक
आरोपी सुनिल दिनकर चव्हाण, वय 19 वर्षे व वंश कालिदास भोरे, वय 21वर्षे शिताफीने पकडून त्यांना बोलते केले असता त्यांनी पनवेल परिसरातील ६ गुन्ह्याची कबुली दिली आहे . व त्यांच्या कडून गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या मालांमधील एकूण 85,200/- रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत केले आहे. त्यामध्ये मोटार सायकल, LED टीव्ही, CCTV कॅमेरा, घड्याळ, हार्ड डिस्क, रोख रक्कम व कॉपर केबल अश्या मालाचा समावेश आहे.
Tags
पनवेल