पनवेल दि. ०५ ( संजय कदम ) : पनवेल जवळील मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे लेनवर कि.मी 03 येथे खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव कारची टेम्पोला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात गाडीतील एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यातील कार क्रमांक MH 04 DY 1238 यावरील चालक नामे धैर्य गाडा वय 21 वर्ष राहणार मुंबई , त्यांचे ताब्यातील कार घेऊन मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पुणे बाजूकडे चालवीत घेऊन जात
असताना किमी 03 या ठिकाणी आले असता त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून शोल्डर लेनवर थांबून असलेल्या आईसर टेम्पो क्रमांक MH 14 HG 1379 यास पाठीमागून ठोकर मारून अपघात केला. सदर अपघातामध्ये कार चालकाच्या बाजूस बसलेले वरून पटेल वय 21 वर्षे राहणार मुंबई यांच्या डोक्याला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली असून त्यांना आय आर बी एम्बुलेंस ने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दवाउपचार करता नेले आहे. अपघातग्रस्त वाहन शोल्डर लेनवर उभे असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
Tags
पनवेल