पनवेल दि. ०५ ( संजय कदम ) : वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गाड्या भाड्याने लावतो असे सांगून अपहार करणाऱ्या एका आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे .
याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात एका अपहार केलेल्या सेव्हरलेट एन्जॉय गाडी संदर्भात तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गद्शनाखाली गाडी नंबर MH 48 P 9574 हिचा शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस उपनिरिक्षक विनोद लभडे,पो.हवा.अविनाश गंथडे,पो.ना.अशोक राठोड,पो. शि.विशाल दुधे आदींचे पथक गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे घेत असताना गुन्ह्यातील आरोपी नामे इम्रान जिन्ना शेख वय 28 रा. वडाळा मुंबई, हा नाशिक येथे लपला असल्याची माहिती मिळून आल्याने सलग तीन दिवस तपास करून या आरोपीस ताब्यात घेतले व सदर गुन्ह्यातील वरील गाडी अहमदनगर येथून हस्तगत केली आहे . या आरोपीने अश्या प्रकारे अनेक जणांच्या गाड्यांचे अपहार केले असल्याने त्याचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहे .
Tags
पनवेल