शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) रायगड पनवेल शिव आरोग्य सेनेने ६१ पदवीधर मतदारांची केली नोंदणीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) रायगड पनवेल शिव आरोग्य सेनेने ६१ पदवीधर मतदारांची केली नोंदणी
पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) :शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉ किशोर ठाणेकर ,महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडू दादा सपकाळ यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली शिव आरोग्य सेना रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ. परेश चंद्रकांत देशमुख यांच्या नेतृत्वात शिव आरोग्य सेना रायगड जिल्हा पनवेल विभागातील पदाधिकाऱ्यांनी खारघर,कळंबोली,खांदा कॉलनी येथे घरोघरी भेट देत पदवीधर मतदारांची नोंदणी केली.
              त्यावेळी स्वतः जिल्हाध्यक्ष डॉ परेश देशमुख ह्यांनी सक्रिय सहभाग घेत नोंदणी करण्याबाबत पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत प्रोत्साहन दिले. लोकांनीही सदर मतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शिव आरोग्य सेना रायगड पनवेल विभाग यांच्याच्याकडून एकूण ६१ पदवीधर मतदारांची नोंदणी यावेळी करण्यात आली.सदरचे पदवीधर मतदार नोंदणी फॉर्म शिवसेना भवन येथे जाऊन महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्याकडे शिव आरोग्य सेना रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ परेश चंद्रकांत देशमुख आणि खारघर शहर संपर्क समन्वयक सचिन सावंत ह्यांच्याकडून आज सुपूर्द करण्यात आले.
त्यावेळी जितेंद्र सकपाळ यांनी पदवीधर नोंदणी निवडणूक,संघटना वाढीबाबत तसेच इतर बाबीवर चर्चा करत मार्गदर्शन केले.सदर पदवीधर मतदार नोंदणी मोहीम मध्ये शिव आरोग्य सेना खारघर शहर संपर्क समन्वयक सचिन सावंत ह्यांनी शिवसेना खारघर शहर समन्वयक रामचंद्र देवरे आणि स्थानिक शिवसेना पदाधिकारी ह्यांच्या सहकार्याने अथक परिश्रम करत एकूण ३९ मतदार नोंदणी स्वतः वैयक्तिकरित्या करत उल्लेखनीय कार्य केले,त्यांचे विशेष कौतुक करत महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडूदादा सकपाळ ह्यांनी शिव आरोग्य सेना रायगड पनवेल पदाधिकाऱ्यांची पदवी मतदार नोंदणी कार्याची प्रशंसा केली,त्यामध्ये पदवीधर मतदारांची नोंदणी करत सदर मतदार नोंदणी मोहिमेमध्ये सहकार्य करणारे शिव आरोग्य सेना कळंबोली शहर संघटक श्रीमती अस्मिता नाईक,खारघर शहर समन्वय सचिव मीनल गरुड,खांदा कॉलनी शहर समनव्यक अर्चना क्षीरसागर यांचाही सहभाग होता.


थोडे नवीन जरा जुने