कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी संस्थेचे प्रांगण मंगळवारी रात्री ११ हजार दिव्यांच्या दीपोत्सवात उजळून निघाले.
कार्तिकी त्रिपुरारी पोर्णिमा आणि दादासाहेब लिमये यांची १०४ वी जयंती यानिमित्त सुधागड एज्युकेशन संस्थेने शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना घरून पणती आणून दिवा पेटवून दीपोत्सव करण्याचे आयोजन केले होते. प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच कळंबोलीत दीपोत्सवाचे आयोजन एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्याने नागरिकांनी दीपोत्सव पाहण्यासाठी गर्दी केली होती.
Tags
पनवेल