बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेल मध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभयात्रा मिरवणुक संपन्न.






बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेल मध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभयात्रा ( मिरवणुक ) संपन्न.

संविधानाबाबत विभागातील नागरिकांन मध्ये जनजगृती करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने बाबासाहेब लिगल पँथर ( कायदेशीर गनरक्षक फौज- महाराष्ट्र राज्य ) संघटनेच्या वतीने संविधान दिना चे औचित्य लक्षात घेऊन रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं 4 वाजता पँथर संघटनेचा लोकार्पन सोहळा व 'संविधान सम्मान शोभयात्रा ( मिरवणुक ) चे आयोजन संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रफुल भोसले सर, व अ‍ॅड. नीलमताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पनवेल मध्ये संपन्न झाले.



     पनवेल मध्ये विविध संघटनांकडून आज संविधान दिना निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, परंतू संविधान सम्मान शोभयात्रा ( मिरवणुक ) फक्त बाबासाहेब लिगल पँथर संघटनेनी विमलवाडी, सुकापुर ते भीम प्रेरणा सांस्कृतीक केंद्र, बुद्धविहार, नविन पनवेल पर्यंत काढण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालनाची जबाबदारी आयु. पंकज चव्हाण यांनी उत्कृष्टरित्या पार पडली. तर प्रा.प्रफुल भोसले यांनी संघटनेची धेय, उदिष्टे उपस्थितांना संगितले. पाहुण्यांचे स्वागत संविधानाची उद्देशीका प्रत भेट स्वरुपात देऊन करण्यात आले. तर लोकार्पन आयु. मनोज भुजबळ अध्यक्ष पनवेल बार कौन्सिल यांच्या हस्ते करण्यात आले.



 शोभयात्रेस शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. अवकाळी वरुण राजाची हजेरी होवून ही, मिरवणुक अत्यंत शिस्तबद्ध व नियोजन बद्ध पद्धतीने करण्यात आली, रथा मध्ये तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती व संविधानाची 5 फुट प्रतिमा , नागरिकांचे मूलभूत हक्कांचे फलक व साथीला पारंपारिक हल्गी वाद्यावर लेझिम नृत्याचे सादरीकरण शोभयात्रेचे ( मिरवणूक ) विशेष आकर्षन राहिले. शोभयात्रेत पनवेल विभागातील सर्व धार्मिक, सामजिक, राजकीय, तसेच विविध सरकारी क्षेत्रांतील नामवंत मान्यवर उपस्थीत होते.


थोडे नवीन जरा जुने