बांगलादेश मधील खुनाच्या गुन्हयातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी केली अटक






बांगलादेश मधील खुनाच्या गुन्हयातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी केली अटक
पनवेल दि.३०(संजय कदम): पनवेल शहर पोलीस ठाणेत पनवेल बस स्टँडच्या परिसरात बांग्लादेशी नागरीक कामाच्या शोधात संशयीतरीत्या फिरत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस पथकांनी पनवेल बस स्टैंड येथे जावुन वातमीची सहानिशा करुन अली सफीज शेख, रविवुल मनन शेख व मेसन किसलू मुल्ला यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे भारतीय नागरीकत्वावावत कागदपत्रांची चौकशी केली असता त्यांच्याकडे भारतीय नागरीकत्वावावत कागदपत्रे नसल्याचे आणि ते बांगलादेशी नागरिक असल्याची खात्री झाली. वरील आरोपी विरोधात पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ६३१/२०२३ पासपोर्ट अधिनियम १९६७ चे कलम ३(अ), १२ (क) सह विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४(अ) अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपींना गुन्हयात अटक केली आहे.




          गुन्हयातील आरोपी पोलीस कोठडी रिमांड मध्ये असताना तपासात बंगाली भाषेचे छायांकित कागद प्राप्त झाले. प्राप्त कागद बंगाली भाषाचे अवगत असलेले पोलीस मित्रांना दाखवुन त्यांच्याकडून कागदातील माहिती समजुन घेतली असता बांगलादेश मध्ये नरईल जिल्हयातील कालिया पोलीस ठाणेच्या अभिलेखावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे आणि गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी अली हाफीज शेख व रविवुल मनन शेख हे संशयीत आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 




सदरची कार्यवाही पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, परिमंडळ ०२, पनवेल व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुम वागवान व पोलीस निरीक्षक (प्रशा) प्रविण भगत, सपोनि प्रकाश पवार, पोउपनि अभयसिंह शिंदे, पोहवा नितीन वाघमारे, पोहवा अविनाश गंथडे, पोहवा  परेश म्हात्रे, पोना रविंद्र पारधी, पोना अशोक राठोड, पोशि संतोष दाहिजे, पोशि नितीन कांबळे व पोशि साईनाथ मोकळ यांनी केली आहे


थोडे नवीन जरा जुने