अज्ञात त्रिकुटाने केली वृद्ध महिलेची फसवणूक




अज्ञात त्रिकुटाने केली वृद्ध महिलेची फसवणूक
पनवेल दि ३०, (संजय कदम) : शेठजींना मुलगा झाला आहे .म्हणून साडया वाटप सुरु आहे तरी तुम्ही तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवा असे सांगून अज्ञात त्रिकुटाने एका वृद्ध महिलेची फसवणूक केल्याची घटना पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घडली आहे . 


                 या परिसरातून सदर महिला जात असताना तीन अज्ञात इसम तिच्या जवळ आले व मोफत साडी वाटप सुरु असल्याची बतावणी करून सदर महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेऊन ते पसार झाले. या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने