कोंकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आढावा बैठका संपन्न
पनवेल दि.०३(संजय कदम): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)उपनेते, रायगड ठाणे व पालघर जिल्हा समन्वयक विजय कदम व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण यांच्या प्रमूख उपस्थितीत कोंकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, खारघर शहर, कामोठा शहर, खांदा कॉलनी, कळंबोली शहर, तळोजा शहर, नवीन पनवेल शहर,पनवेल शहर या सर्व शहरामध्ये आढावा बैठका घेण्यात आल्या. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, रायगड ठाणे व पालघर जिल्हा समन्वयक विजय कदम यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख संदीप तांडेल, महानगर समन्वयक दिपक घरत,उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, उपमहानगर प्रमूख रामदास गोंधळी, उपमहानगर संघटक सुनीत पाटील, खारघर शहरप्रमुख गुरुनाथ पाटील, कळंबोली शहरप्रमूख सूर्यकांत म्हसकर, कामोठे शहर संघटक संतोष गोळे, खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल शहर संघटिका अपूर्वा प्रभू, पनवेल शहर संघटिका अर्चना कुलकर्णी, कामोठे शहर संघटिका संगीता राऊत,कलंबोली शहर संघटिका ज्योती मोहिते,व प्रेमा आप्पाच्या मॅडम, जिल्हाधिकारी पराग मोहिते उपशहर प्रमुख अविनाश केणी, हरेश पाटील, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसैनिक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
पनवेल