पनवेल दि.०३(संजय कदम): गुरुवर्य महंत आनंदजी महाराज खंडागळे, चौक व ह.भ.प. जगन्नाथ बाबा रत्नाकर, श्री क्षेत्र संगम यांच्या कृपा आशिर्वादाने कै. बाळाराम कोंडाजी लबडे यांच्या स्मरणार्थ योगीराज चांगदेव महाराज समधी मंदिर श्री क्षेत्र पुणतांबे ता. राहता, जि. अहमदनगर या ठिकाणी अखंड हरिनाम उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.
या अखंड हरिनाम उत्सवाचे व्यवस्थापन श्री सद्गुरु माऊली सेवा मंडळ, केंद्र चौक श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ, बारवईपुल परिसर यांनी केले होते तर आयोजक म्हणून ह.भ.प. श्री. दामोदर सिताराम लबडे ह.भ.प. श्री. काशिनाथ महाराज लबडे श्री. मोहन शेठ बाळाराम लबडे मु. खानावले, ता. पनवेल, जि. रायगड यांनी काम पाहिले. अत्यंत धार्मिकते हा उत्सव संपन्न झाला
Tags
पनवेल