रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पिरकोन ह्या गावातून सतीश गावंड आणि सुप्रिया पाटील व त्यांचे शेकडो एजंट ह्यानी हजारो लोकांना रक्कम दुप्पट करुन देतोय सांगून शेकडो करोडो रुपयांना फसविले, त्याला अटक झाली आणि आश्चर्यरित्या त्याला जामीन पण मिळाला होता आणि मग हा आरोपी फरार झाला, लोकाना फसवून गायब झालेला हा आरोपी हवाला मार्गे पैसे घेऊन नेपाळ मार्गे हा देशातून पलायन करणार होता मात्र ह्या प्रकरणात कोणताही स्थानिक नेता, कोणताही पक्ष पडला नाही ना कोणी पुढे आले
गावगावात जाऊन ह्या बाबत प्रबोधन केले हे दाखवून ही फसवणूक ३०-४० कोटींची आहे असे दाखविले गेले मात्र आम्ही गावा गावात गेलो, बैठका घेतल्या, मोबाईलवर गुंतवणुकीचे msgs पाहिले आणि हजारो फॉर्म भरून ह्याची व्याप्ती ३००-४०० करोड पेक्षा जास्त असल्याने लवकरच नागपूर येथे अधिवेशनात जाऊन रूपेश पाटील हे गृहमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांनी भेट घेऊन ह्या बाबत अधिक माहिती देणार असून त्याने सर्व फसविलेल्या जनतेला पैसे परत मिळण्यास मदत होणार आहे !
३०-४० करोड एक एका गावातूनच फसविलेले असून १७० ते २०० गावातून, अनेक शहरातून व अनेक जिल्ह्यातून लोकांची फसवणुक झाली असून ह्याची व्याप्ती मिड डे वृत्यपत्राने दिल्या नुसार १-२ हजार कोटींची असल्याचे सांगितले आहे.
ह्या साठी एकत्र येऊन मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन ह्यावेळी रुपेश पाटील यांनी केले आहे ह्या साठी संघर्ष समितीचे सचिव खोपटे येथील महेंद्र पाटील यांच्या सोबत संपर्क करण्याचे आवाहन केले आहे - 96197 97676.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांजकडे दिले जाणार आहेत आणि त्यानुसार त्यानी एक विशेष तपास यंत्रणा लावावी
असे निवेदन दिले आहे आणि साहेबांनी त्यावर सही करुन तो प्रस्ताव पुढे पाठविला आहे त्यामुळे लवकरच तशी कारवाही होऊन जनतेला न्याय व पैसे परत मिळतील ह्यात वाद नाही !!
ही प्रक्रिया लवकर होण्यासाठी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Tags
पनवेल