कामोठे वसाहतीमध्ये सेक्टर ८ मधील मैदान विकसित करण्याची शेकापची मागणी







पनवेल दि. : दि.९ डिसेंबर (4K News)कामोठे शहरात काही ठराविक मैदाने सर्वासाठी खुली आहेत, त्यात प्रामुख्याने सेक्टर ८ मधील मैदान देखील येते. 


प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आजमितीस हे मैदान ओसाड झाले आहे. जागोजागी मोठे दगड, उंच, सखल भाग, वाढलेले जंगली गवत त्यामुळे येथे मुले खेळण्यास टाळाटाळ करतात. त्यातच मैदानासमोरील बार मधील मद्यपीच्या रात्र-दिवस मैफिली जमत आहेत.

                      सदर मैदान शहराच्या मध्यभागी असल्याने येथे साफसफाई केल्यास मुलांना खेळण्यासाठी चांगले मैदान मिळेल तसेच डासांची उत्पत्ती कमी होईल त्यामुळे आजूबाजूच्या इमारती मधील राहिवाश्याना देखील दिलासा मिळेल.
 मैदाना अभावी मुले टीव्ही, मोबाईल यांच्यात व्यस्त झाली आहेत. त्यांना काही अंशी लगाम होईल. तरी पनवेल महानगर पालिकेने बाल मनांचा सहानुभूतीने विचार करावा आणि सदर मैदान लवकरात लवकर विकसित करून मुलांना खेळण्यासाठी हक्काची जागा मिळवून द्यावी, अशी मागणी शेकाप कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .






थोडे नवीन जरा जुने