पनवेल वाहतूक शाखेमार्फत सी के टी कॉलेजमध्ये वाहतूक नियम पाळण्यासंदर्भात विद्याथ्यांना करण्यात आले आवाहन
पनवेल दि.१४(संजय कदम): पनवेल वाहतूक शाखे तर्फे खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयांत वाहतुकीचे नियम पाळण्या संदर्भात विद्यार्थ्यांना आवाहन पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी आज केले.
पनवेल वाहतूक शाखेमार्फत सी के टी कॉलेज खादा कॉलनी पनवेल येथे महाविद्यालय विद्यार्थ्याना वाहतूक नियम पाळणे बाबत तसेच हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, सिग्नल जम्पिंग न करणे या बाबत सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल एस के पाटील, बी. एस. पाटील यांच्यासह प्राध्यापक वृंद, वाहतूक पोलिसांचे अधिकारी, युनायटेड वे या एमनजीओ चे कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी छोटे छोटे वाहतूक नियमांचे पालन केल्याने गंभीर अपघात टाळून आपला जीव कुटुंबावरील आघात टाळता येऊ शकतो याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
Tags
पनवेल