पनवेल दि.१४:( 4k News)सिडको ने आदिवासी आणि अनुसूचित जातीच्या प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली असून त्याच्या याविरोधात येत्या २० डिसेंबर २०२३ पासून प्रकल्पबाधित दाद मागण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणाला बसणार आहेत.
पनवेल जवळील वडघर नामदेव वाडी येथील लक्ष्मीबाई लाडक म्हसे, जयश्री विजय पाटोळे, कुरसन बारक्या वाडू व विजू दामा सांबार यांची राहती घरे सिडकोने निष्कासीत केली. त्या बदल्यात सिडको त्यांना 2४० चौरस मीटर विकसित प्लॉट देणार होती. तशा प्रकारचा करारनामा सिडकोने संबंधित वरील प्रकल्पग्रस्तांसोबत केलेला आहे. परंतु सिडकोच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांना वादग्रस्त भूखंड देऊन केला आहे.
प्रकल्पग्रस्तांना असा संशय आहे की कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी वडघर नामदेव वाडी येथील आदिवासी व अनुसूचित जातीच्या गरीब रहिवाशांची सिडकोच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटचे अधिकारी फसवणूक करीत आहेत . गेली दहा वर्ष सिडको द्वारे प्रकल्पग्रस्तांची फसवणूक होत आहे. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी 20 डिसेंबर 2023 पासून सर्व प्रकल्पग्रस्त व त्यांचे परिवारातील सदस्य महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालय येथे साखळी उपोषणास बसणार आहेत . प्रकल्पग्रस्तांची अशी मागणी आहे की जे सिडकोचे प्लॅनिंग डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी व त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
Tags
पनवेल