पनवेल दि.१४(संजय कदम): पनवेल परिसरात आठवड्यातील एक दिवस पाणीपुरठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पाणी जपून वापरणायचे माजी विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांचे पनवेलकरांना आवाहन केले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पुढील वर्षी जून मध्ये पाऊस पडेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करता यावा यासाठी पनवेल महानगरपालिकेने १२ डिसेंबर २०२३ पासून पाण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला असून. आठवड्यातून एक दिवस प्रत्येक भागातील पाणी पुरवठा बंद राहील. तरी नागरिकांना विनंती आहे की मिळणारे पाणी जपून वापरावे तसेच आपल्या परिसरात कुठेही पाण्याची नासाडी होत असल्याचे लक्षात आल्यास पनवेल महानगरपालिकेशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल करांना केले आहे.
Tags
पनवेल