ऑईलने भरलेला कंटेनर झाला पलटी; मोठ्या प्रमाणात ऑइल पसरले रस्त्यावर*







*ऑईलने भरलेला कंटेनर झाला पलटी; मोठ्या प्रमाणात ऑइल पसरले रस्त्यावर* 
पनवेल दि.१४(4kNews): पनवेल तालुक्यातील कासारभट येथून चालेल ऑइल भरलेला कंटेनर अचानकपणे रस्त्यावर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात ऑइल रस्त्यावर पसरले होते. 


              तालुक्यातील कासारभट या ठिकाणी उरण बाजूकडून ऑईलने भरलेला एक ट्रेलर कंटेनर चालला असताना अचानकपणे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर कंटेनर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. यावेळी कंटेनरच्या आतमधील ऑइल रस्त्यावर पसरत गेले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील जागृत नागरिकांनी ही बाब त्वरित वाहतूक शाखेला व सिडकोच्या अग्निशामक दलाला कळवली तातडीने त्यांची पथके घटना स्थळी होचले आणि क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेला कंटेनर सरळ केला तसेच रस्त्यावर पडलेल्या ऑइलवर माती टाकली. यामुळे काहीकाळ वाहतूक रोखण्यात आली होती. 


थोडे नवीन जरा जुने