मेट्रो मधील सफाई कामगारांचा कापला पगार; आझाद कामगार संघटना मागणार दाद

  
पनवेल दि.  दि.२५ डिसेंबर (4K News)नुकत्याच सुरू झालेल्या सिडकोच्या नवी मुंबई मेट्रोला औद्योगिक न्यायालयाने बजावली आहे मेट्रोमध्ये नोटीस सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांच्या पगाराच्या रक्कमेतून ५ हजार ३०६ रूपये कमी दिले जात आहेत, अशी तक्रार आझाद कामगार संघटनेने आद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत मेट्रो प्रशासनाला कामगार नोटीस बजावण्यात आली आहे.  





                      मेट्रोची ११ स्थानके, कारशेड, कार्यालयांची स्वच्छता राखण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन प्रशासनाने शुभा सिस्टीम व ईक्विटी प्रॉपर्टी मॅनेजर प्रायव्हेट लिमिटेड
या कंपनीला ठेका दिला आहे. यामध्ये ९३ सफाई कर्मचारी आहेत.




 किमान वेतन कायद्यानुसार संबंधित कामगारांना १७ हजार ३५३ रुपये इतका पगार मिळणे बंधनकारक आहे. परंतू चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कामगारांच्या हातावर संबंधित ठेकेदाराकडून १२ हजार ४७ रुपये इतके वेतन दिले जाते. मेट्रो सुरू होण्यापुर्वीपासून मागील दोन वर्षांपासून कामगारांच्या पगारातील थोडेफार नव्हे तर ५ हजार ३०६ रुपये कोणाच्या खिशात जातात याबाबत कामगारांना माहिती दिली जात नाही. इथल्या कामगारांनी आझाद कामगार संघटनेकडे तक्रार केल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी या प्रकारणात न्यायालयात धाव घेतली आहे.

थोडे नवीन जरा जुने