रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने विकसित केलेल्या उद्यानाचे लोकार्पण संपन्न घनदाट जंगल प्रकल्पाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या औचीत्याने केले लोकार्पण
पनवेल दि. दि.२५ डिसेंबर (4K News) रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या वतीने येथील उरण रोडच्या बाजूला घनदाट जंगल प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर रोटरी क्लबच्या वतीने उद्यान विकसित करण्यात आले आहे.

घनदाट जंगल प्रकल्पाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या औचित्याने विकसित केलेल्या उद्यानाचे लोकार्पण सोमवार दिनांक २५ डिसेंबर रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर ,माजी आमदार बाळाराम पाटील, प्रकल्प संयोजक तथा रोटरी चे माजी प्रांतपाल डॉ.गिरीश गुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मागच्या वर्षी रोटरी क्लबच्या वतीने घनदाट जंगल प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पाची संकल्पना पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते रोटेरियन परेश ठाकूर यांची असून रो.डॉक्टर गिरीश गुणे या प्रकल्पाचे संयोजक आहेत. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांसाठी उद्यान विकसित करण्यात आले. लहान मुलांसाठी खेळणी,जॉगिंग ट्रॅक,शोभिवंत फुलझाडे, उत्तम प्रकाश योजना यामुळे हे उद्यान पनवेलकरांच्या हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण बनणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रोटरी क्लब ने पूर्ण केलेल्या या दोन्ही प्रकल्पांची मुक्त कंठाने प्रशंसा केली तसेच आगामी काळात कुठलेही सहकार्य लागल्यास ते देण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी असेन असे आश्वासन दिले. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाचे अध्यक्षस्थानी रोटेरियन. डॉ.अमोद दिवेकर, रोटेरियन डॉ. अभय गुरसूळे, रोटेरियन डॉ. लक्ष्मण आवटे आणि रोटेरियन रतन खारोल हे आहेत .

घनदाट जंगल प्रकल्प प्रथम वर्धापन दिन सोहळ्यासाठी आणि उद्यान लोकार्पण कार्यक्रमासाठी उद्योजक जे एम म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, शिवसेना (उबाठा) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटील, शिवसेना पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, मा. विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे ,माजी नगरसेविका दर्शना भोईर, उद्योजक अमोघ प्रशांत ठाकूर, सुप्रसिध्द व्याख्याते प्रशांत देशमुख, लक्ष्मण पाटील, रतन खरोल, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगरसेविका चारुशीला घरत, माजी नगरसेवक अरुणकुमार भगत, राजू सोनी, संदीप गायकवाड, अनिल ठकेकर, सुनील गाडगे, ऋषिकेश बुवा, दीपक गडगे, संतोष घोडीदे, अनिल खांडेकर, गिरीश वारंगे, शैलेश पोटे, विवेक वेलणकर, विक्रम कैया, भगवान पाटील, मनोज आंग्रे, प्रीतम कैया यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने