स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीतील माथाडी कामगारांना ठेकेदारामार्फत उध्वस्त करण्याचा प्रयत्न

        
                                         
पनवेल  : दि.२५ डिसेंबर (4K News)कळंबोली  स्टील मार्केट येथे असलेल्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये माथाडी कामगार गेली अनेक वर्षे राबत आहेत. कंपनीच्या नियमांनुसार याठिकाणी काम होणे गरजेचे असताना कामगार युनियनचे अध्यक्ष, मुकादम आणि कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी यांनी हातमिळवणी करून चुंबकीय प्रणालीद्वारे काम करण्यास सुरुवात केली. याचा फटका माथाडी कामगारांच्या उपजीविकेवर पडला असल्यामुळे कंपनीतील ६०० माथाडी कामगारांपैकी ४५० कामगारांनी मनसेच्या कामगार सेनेचा आधार घेत आपल्या न्याय हक्कासाठी तीन दिवसीय काम बंद आंदोलन केले. 


यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडे माथाडी कामगारांसाठी एका वाॅगेनसाठी १८ हजार दिले जात होते आणि आजही येत आहेत, मात्र पूर्वी दिले जाणारे पैसे आता कमी करून कामगारांना केवळ २६००/- रुपये दिले जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आणि काम बंद आंदोलन केले. अखेर कंपनी व्यवस्थापनाने याची दखल घेवून दिनांक २९ डिसेंबर रोजी बैठक लावून यातून मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी पुन्हा काम सुरू केले. कळंबोली येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीतील कामगारांवर अन्याय करताना त्यांच्या पगारामध्ये ८० टक्के कपात करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनी व माथाडी कामगार यांच्यामधील झालेला करार विचारात न घेता मायजॅक (चुंबक ) पद्धतीने काम केले जात असल्याने त्यांच्या नोकरीवर गदा आली. 


कामगारांना मिळत असलेल्या तुटपुंज्या पगरामुळे कामगार उध्वस्त होणार आहे. त्यामुळे आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडताना कामगारांनी मराठी सेनेच्या मध्यामतून तीन दिवस काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे कंपनीने कामगारांशी वाटाघाटी करून यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत दिनांक २९ डिसेंबर रोजी बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना दिल्यानंतर कंपनीमध्ये काम सुरू करण्यात आले. गेली ४० वर्षापासून महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार युनियनच्या झेंड्याखाली काबाडकष्ट करणाऱ्या माथाडी कामगारांच्या वाट्याला या युनियनने कंपनी व ठेकेदार यांचाशी हातमिळवणी करून माथाडी कामगार संपविण्याचा घाट घातला असल्याचा आरोप देखील यावेळी कामगारांनी केला. सुरुवातीपासून स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी माथाडी बोर्डात पगार जमा करत होती. मात्र गेल्या दहा वर्षापासून कंपनीचे काही अधिकारी, महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार युनियनच्या कार्याध्यक्ष यानी संगनमत करून हा पगार ठेकेदाराकडे वळविला, त्यामुळे कामगारांच्या पगारात कपात होवून तो आज रस्तावर आला आहे. 

या प्रकारामुळे काही कामगारांनी आपल्या नोकरीला रामराम करून रिक्षा व्यवसाय सुरू केला आहे तर काहीना आपले गाव गाठावे लागले आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी घेवून आणि माथाडीचे मुकादम यांना काम जाणार याची भीती दाखवून फसवणुक करून करार बदलण्यात आला. मायजॅक ( चुंबक ) न वापरता क्रेन वापरण्यात यावी, असे सर्व कामगार यांचा निर्णय झाला. सर्व काम मायजॅक द्वारे केले जात असल्याने माथाडी कामगाराचे काम काढून घेवून त्यांना संपविण्याचा प्रकार येथे सुरू आहे. पूर्वी एका वाॅगेन ( लोड ) साठी आठरा हजार दिले जायचे ते आता सव्हिसशे रुपये देण्यात येतात. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये नैराश्य आले. ८० टक्के पगार कपात झाल्याने माथाडी कामगार अडचणीत आला. त्यांनी आपले अस्तित्व टिकविण्यासाठी मनसेच्या मराठी कामगार सेनेची स्थापना केली. त्यात सहाशे माथाडी कामगारा पैकी ४५० कामगार सामील झाले. मराठी कामगार सेनेचे महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी मधील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. ते आंदोलन तीन दिवस सुरू राहिले. कंपनी व्यवस्थापनाने माथाडी कामगारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करून आपल्या मागण्यांचा विचार केला जाईल. त्यासाठी २९ डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे लेखी आश्वासन दिले.थोडे नवीन जरा जुने