एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दोघेजण पसार
byGaurav Jahagirdar -
0
वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दोघेजण पसार पनवेल दि १९(4kNews) एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दोघेजण मोटारसायकलीवरून पसार झाल्याची घटना खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
येथील डीमार्ट समोरील रस्त्यावरून ७७ वर्षीय वृद्ध महिला इतर महिले सोबत पायी जात असताना मोटारसायकलीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख पंधरा हजार रुपयाची सोनसाखळी घेऊन ते पसार झाले आहेत.