तळोजात दत्तजयंती रौप्य महोत्सव




पं.आनंद भाटे, पं.उमेश चौधरी, पं.रतन मोहन शर्मा अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या सहभागाने रंगणार महोत्सव
पनवेल : दि.१८ डिसेंबर (4K News) वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत श्री नवनाथ सेवा मंडळ योगीनगर धोंडली यांच्यावतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 'श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह व श्री दत्तजयंती उत्सव सोहळा' आयोजित करण्यात आला आहे. दिनांक १९ डिसेंबरला या सोहळ्याचा प्रारंभ तर परिसंगता २७ डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी पं.आनंद भाटे, पं.उमेश चौधरी, पं.रतन मोहन शर्मा अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या सहभागाने हा महोत्सव रंगणार आहे.






       १९ डिसेंबरला कीर्तिताई काटे यांचे प्रवचन, बाळगोपाळ हरिपाठ मंडळ घोट यांचे हरिपाठ, तर अजय सुगावकर व गणेश गोंधळी यांची अभंगवाणी, दिनांक २० डिसेंबरला ह. भ. प. निवृत्तीबुवा महाराज यांचे प्रवचन, गावदेवी महिला हरिपाठ उसाटणे मंडळाचे हरिपाठ, पंडित उमेश चौधरी व सुप्रसिध्द अभिनेत्री गायीका स्वरांगी मराठे यांचे शास्त्रीय गायन व अभंगवाणी, २१ डिसेंबरला वैष्णवी म्हात्रे यांचे प्रवचन, सदगुरू वामनबाबा महाराज महिला मंडळ तळोजे मजकूर यांचे हरिपाठ, तर पंडित आनंद भाटे व विदुषी भाग्यश्री देशपांडे यांची अभंगवाणी, २२ डिसेंबरला ह. भ. प. ओम महाराज यांचे प्रवचन, गावदेवी महिला हरिपाठ मंडळ वावंजे यांचे हरिपाठ, वैष्णवी पाटील, बागेश्री क्षीरसागर व पूर्वा क्षीरसागर यांची अभंगवाणी, २३ डिसेंबरला ह. भ. प. आत्माराम महाराज यांचे प्रवचन, ह. भ. प. माधव महाराज नामदास यांचे किर्तन, सदगुरू वामनबाबा हरिपाठ मंडळ करवले यांचे हरिपाठ, महेश कंठे व श्री.ओम बोंगाणे यांची अभंगवाणी, २४ डिसेंबरला ह. भ. प. बामा महाराज यांचे प्रवचन गाडगेबाबा महिला हरिपाठ काटई मंडळाचा हरिपाठ, ह. भ. प. महादेव महाराज राऊत यांचे किर्तन, सिद्धार्थ बेलमन्नू यांची अभंगवाणी, २५ डिसेंबरला ह. भ. प. दतु महाराज यांचे प्रवचन, राधाकृष्ण हरिपाठ पिसार्वे मंडळाचे हरिपाठ, ह. भ. प. जयंत महाराज गोसावी यांचे किर्तन, तसेच पंडित रतन मोहन शर्मा यांची अभंगवाणी



, २६ डिसेंबरला पहाटे काकड आरती, नित्यपूजा, महारुद्र अभिषेक व दत्तयाग त्यानंतर मंगेश चौधरी, अक्षय चौधरी व कामिनी चौधरी यांची तसेच योगेश नाईक व प्रणिता देशमुख, कृष्णा पवार व कृष्णा ठाकूर,यांची अभंगवाणी, सायंकाळी ०६ वाजता ह. भ. प. करवीर महाराज पाटील यांचे दत्तजन्मपर व्याख्यान, सायंकाळी ०७ वाजता श्रीदत्त महाराजांची पालखी भव्य मिरवणूक सोहळा व महाआरती तसेच रात्री ०८ वाजता इंडियन आयडॉल फेम अंजली गायकवाड व नंदिनी गायकवाड यांचे गीतगायन तर दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ह. भ. प. बाळकृष्ण दादा महाराज वसंतगडकर यांचे काल्याचे किर्तन अशी मोठ्या प्रमाणात आध्यत्मिक कार्यक्रमे होणार आहेत. 






                  प. पु. योगीराज गुरुवर्य यशवंत महाराज यांना जेव्हा दत्त महाराजांच्या साक्षात्काराची अनुभूती झाली त्या वेळेला श्री स्वामी समर्थ महाराज (अक्कलकोट) यांनी " गावाच्या बाहेर पर्णकुटी उभारून स्वतः ११ महिने काही न खाता तुझ्या कडे जे काही पाच दहा लोकं भाविक भक्तगण येतील त्यांना अन्नदान सेवा सुरू कर" या आदेशाचा पालन करत स्वतः ११ महिने उपवास करून आपल्या यथाशक्ती नुसार अन्नदान सुरू केले. यावर्षी मठाला २५ वर्ष पूर्ण होत असून आजही अन्नदान सेवा अविरत पणे सुरू आहे. दर गुरुवारी दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसाद आणि सायंकाळी नित्य पालखी सोहळा त्यानंतर रात्री महाप्रसाद अश्या प्रकारे दोन वेळेला अन्नदान सुरू आहे. तसेच दर पौर्णिमेला हवन (याग), व्यास पौर्णिमा, महाशिवरात्री, गोपाळकाला,श्री गणेश उत्सव, श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, श्री दत्त जयंती उत्सव, धर्मनाथ बीज हे सण प्रामुख्याने साजरे होत असतात. तसेच अध्यात्मिक मार्गदर्शन,सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रम व गरजूंना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशी विविध उपक्रमे राबवत अध्यात्मिक आणि सामाजिक जबाबदारी पार पाडली जात आहे. त्यामुळे रौप्य महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने या सोहळ्याचे महत्व अनन्य साधारण आहे.



थोडे नवीन जरा जुने