शासनमान्य रोजगाराभिमुख मोफत प्रशिक्षण*
पनवेल दि.१३(संजय कदम): रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत Business Development Executive - BFSI या प्रशिक्षण कार्यक्रमाचे मोफत आयोजन केले आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी ५ आठवडे असून त्यानंतर ४ आठवडे नोकरी प्रशिक्षण असेल. वय वर्ष १८ ते ३० वयोगटातील कोणत्याही शाखेतील पदवीधर ह्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ शकेल. प्रशिक्षणामध्ये इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंग, पर्सन्यालिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग, इंडस्ट्री व्हिजीट, प्लेसमेंट असिस्टंस यांचा समावेश असेल. नाव नोंदणीसाठी यशवंत मेमोरियल ट्रस्ट, पनवेल 9819248771 / 9819540448 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी की आहे.
Tags
पनवेल