महेश साळुंखे यांनी दत्त जयंती महोत्सवानिमित्त वेग वेगळ्या मंडळांना भेट देऊन दर्शन घेतलेस्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दत्त जयंती महोत्सवानिमित्त वेग वेगळ्या मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले. मिरची गल्ली कुंभारवाडा पनवेल येथील चैतन्य मित्र मंडळाच्या वतीने राजा परदेशी व शंकर पनवेलकर यांनी त्यांचं स्वागत केलं. त्याचबरोबर कानिफनाथ मित्र मंडळ टपाल नाका पनवेल, एम एस ई बी ऑफिस पनवेल, पनवेल तालुका पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी दत्त जयंती महोत्सव ला त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली व त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला . दिनांक 31 डिसेंबर रोजी भीमा कोरेगाव येथे जाणाऱ्या आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांचं महेश साळुंखे यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह पनवेल येथे स्वागत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एक जानेवारीला महेश साळुंखे हे भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभास अभिवादन करण्याकरता रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसमवेत जाणार आहेत.


थोडे नवीन जरा जुने