श्री भगवती साई संस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न


श्री भगवती साई संस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न
पनवेल दि.०१4kNews: नववर्ष स्वागताच्या निमित्ताने व मंदिराच्या ४१ वा वर्धापन दिनानिमित्त पनवेलमध्ये श्री भगवती साई संस्थानच्या वतीने पालखी सोहळा आज झाला 
           ही पालखी मिरवणूक आज सकाळी श्री साईबाबा मंदिरातून काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात रथामध्ये बसलेले श्री साईबाबा त्याचप्रमाणे श्री नारायण बाबा यांच्या मुर्त्या स्थापित करण्यात आला होत्या.  हा सोहळा पनवेल रेल्वे स्थानक, पनवेल बस स्थानक, लाईन आळी, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा, सोसायटीमार्गे पुन्हा श्री साईबाबा मंदिर अशी वाजत गाजत ओम साईच्या गजरात काढण्यात आली. या मिरवणुकीत श्री साईबाबाचे तसेच श्री साईबाबा नारायणचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


थोडे नवीन जरा जुने