पनवेल : दि. 5 जानेवारी (4K News) PNVEK महानगर पालिकेच्या मा. नगरसेविका सौ लीना अर्जुन गरड यांनी मतदार याद्या दुरूस्ती बाबत मुदत वाढवून देण्याची तहसीलदारांना मागणी केली आहे
आपल्या पत्रात माजी नगरसेविका म्हणतात,
"पनवेल निवडणूक विभागाकडून दुबार नोंदणी किंवा मतदार पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर जाणे इत्यादी कारणासाठी पनवेल महानगरपालिकेमध्ये नोकरीस असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बूथ लेवल ऑफिसर ( बी एल ओ) म्हणून नेमून त्यांच्याकडून मतदारांचा सर्वे करण्यात आलेला होता, परंतु पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून मतदारांचा सर्वे चुकीच्या पद्धतीने केल्याचे दिसून येत आहे. कारण पनवेल महानगरपालिकेकडून दिलेली नोटीस मतदारापर्यंत व्यवस्थित पोहोचली असताना , पनवेल महानगरपालिकेचा बीएलओ मतदारापर्यंत कसा काय पोहोचला नाही? हे मोठे प्रश्नचिन्ह आहे.
एकंदरीत पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून यात गंभीर चुका झालेल्या दिसून येत आहेत. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.
तसेच मतदारांना 5 जानेवारी रोजी उत्तर देण्याबाबतच्या नोटिसा, 4 जानेवारी रोजी मतदारांना पोचले आहेत. त्यामुळे त्यांना तहसीलदार निवडणूक विभागाकडे उत्तर देण्यास अजिबात वेळ मिळालेला नाही. म्हणून अशा प्रकारच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी पनवेल तहसीलदार निवडणूक विभागाकडून कमीत कमी अजून दोन आठवडे मुदतवाढ देणे गरजेचे आहे.
तसेच सध्या आधुनिक संगणकाचा आणि सोशल मीडियाचा जमाना असल्याने, आपण वगळण्यात येणारी नावे एका लिंक मध्ये टाकून, सदरची लिंक, सर्व राजकीय पक्षांना, सामाजिक संस्थांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक मतदार स्वतःच्या नावाची खात्री करू शकेल आणि पनवेल विधानसभेतल्या रहिवासी असणारा मतदार, प्रशासनाच्या चुकीमुळे वगळला जाणार नाही.
त्यांनी पुढे म्हटले "चुकीचे काम करण्यात करणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, 2. नोटीसला उत्तर देण्यासाठी किमान दोन आठवडे मुदत वाढवण्यात यावी, 3. आणि वगळण्यात येणाऱ्या मतदाराची लिंक व्हायरल करून सर्व मतदारांना उपलब्ध करून द्यावी.
या बद्दल मा. नगरसेविका लीना अर्जुन गरड यांनी तहसीलदार कार्यालयात भेट देवून नायब तहसीदारांना निवेदन देण्यात आले .
Tags
पनवेल