मालेवाडीतील कार्तिक्य पार्क मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा





पनवेल दि.२७(संजय कदम): छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पडघा असणाऱ्या माळेवाडीतील कार्तिक्य पार्क सोसायटी ने 75 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्सात साजरा केला.



      उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला. 26 जानेवारी म्हाणजे भारतीय प्रजासत्ताक दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलि भारताची राज्यघटना, संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली व 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आले. भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला. याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना दिवस म्हाणजेच भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून प्रत्येक भारतीय साजरा करतो. मालेवाडी येथिल कार्तिक्य पार्क सोसायटीने दरवर्शी प्रमाने याही वर्षी प्रजासत्ताक दिनाचे आयोजन केले



. सोसायटीत देशाच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण सोसायटीतिल जेष्ठ नागरीक माजी सैनिक विठ्ठल भगत व हीरालाल कोहली यांच्‍या हस्ते करणयात आले, सामुहिक राष्ट्रगीत घेवुन राष्ट्रध्वजास मान वंदना देन्यात आली, भगत यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन करुन संविधानाचे संरक्षण करण्याची सामुहिक शपथ दिली, तसेच सोसायटीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले. सोसायटी मधील रहिवासी यांनी कार्यक्रमास उपस्थीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.





थोडे नवीन जरा जुने