आकड्यांचा जुगार सट्टा चालविणार्‍यांविरुद्ध गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलची कारवाई

 
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः बेकायदेशीररित्या आकड्यांचा जुगाराचा सट्टा चालविणार्‍याविरोधात गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने छापा टाकून धडक कारवाई केली असून जवळपास 40 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


शहरातील मानसी स्किल गेम या नावाने असलेल्या शॉपमध्ये आरोपी इर्शाद सरखोत व संगणक चालक सुरज राजभर यांनी विनगेम नावाचा ऑनलाईन स्किल गेम चालवून बेकायदेशीररित्या आकड्यांचा जुगार सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांना मिळताच वपोनि उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून जवळपास जुगाराचासाठी लागणारा 40 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे व त्यांच्या विरोधात लॉरी रेग्युलेशन अ‍ॅक्ट 7 (3), 9 (1) जुगार प्रतिबंध कायदा कलम 4 (1) (अ), 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.थोडे नवीन जरा जुने