जयदास बाबुराव घरत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने करण्यात आले सन्मानित

पनवेल दि ११, (संजय कदम) : पनवेल तालुकयातील रायगड जिल्हा परिषद शाळा वडघर मराठी येथे नुकत्याच पार पडलेल्या शाळेच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाचे आयोजन शाळेचे आजी माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला.                    या कार्यक्रमात शाळेसाठी भरीव कामगिरी करणारे सुसंस्कारित व गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी मेहनत करणारे,समाजाशी शाळेच्या कामासाठी सतत संपर्कात राहणारे उत्तम शैक्षणिक कार्य करणारे जयदास बाबुराव घरत यांना पनवेल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सीताराम मोहिते,श्रीवर्धन गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे सुरेश जोशी केंद्रप्रमुख म. रा.प्रा.शिक्षक संघ.रायगड अध्यक्ष डॉ सुभाष भोपीं ,तालुका अध्यक्ष प्रभाकर घरत,उरण पतपेढी चेअरमन डॉ.प्रशांत पाटील, अभिजित मटकर कनिष्ठ अभियंता समग्र शिक्षा अभियान, यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी चंद्रकांत कांबळे,अध्यक्ष, मोहन गायकवाड अध्यक्ष, प्रफुल्ल थले मुख्याध्यापक कुणाल लोंढे (सचिव- रायगड जिल्हा पोलीस पाटील संघ करंजाडे पोलीस पाटील) भरत सोनवणे, प्रवीण जाधव, अनिल भातांकर, संतोष सोनवणे, महेश साळुंखे, सोनू साळुंखे, अनंत कांबळे, कुणाल कांबळे व विविध महिला मंडळाच्या अध्यक्षा आदी मान्यवर, शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ,उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने