शिवसेनेचे मुख्यनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न






पनवेल दि ११, (वार्ताहर) : शिवसेनेचे मुख्यनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहर शिवसेनेच्या प्रभाग 14 अंतर्गत कुंभारवाडा येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.



               ह्या स्पर्धेत परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, होतकरू विद्यार्थी यांनी त्यानिमित्ताने एकत्र यावे या उद्देशाने प्रभाग क्रमांक 14 चे विभाग प्रमुख एड. आशिष पनवेलकर यांच्या संकल्पनेतून चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक ॲड प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या हस्ते व शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहर प्रमुख मच्छिंद्र झगडे उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी ,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.


 आशिष पनवेलकर यांच्यासह हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्रमांक 14 कुंभारवाडा मधील विभाग प्रमुख आशिष पनवेलकर, तसेच शाखाप्रमुख किरण कळवेकर, उप शाखाप्रमुख प्रतिक वाजेकर, युवासेना शाखा प्रमुख ओंकार पनवेलकर, अनिकेत जैस्वाल,रसूल बागवान, उपशहर वैद्यकीय कक्ष हितेंद्र पेडामकर शिवसैनिक दैवत पनवेलकर ,शिवसैनिक नरेंद्र पनवेलकर या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. 80% समाजकारण व 20% राजकारण या बाळासाहेबांच्या सूत्रानुसार कुंभारवाडा व प्रभाग क्रमांक 14 शिवसेनेची वाटचाल सुरू असल्याचे यावेळेस सोमण यांनी सांगितले. तर स्थानिक कुंभार समाजाचे पंच दिलीप पनवेलकर ,कल्याणकर यांनी देखील शिवसेनेचे आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने