पनवेल दि ११, (संजय कदम) : पनवेल शहरा जवळील तक्का परिसरातील आमराई येथील दर्ग्याजवळील गाढी नदीच्या पात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहे.
सदर इसमाचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष, रंग सावळा, अंगात काळ्या रंगाचा गोल गळ्याचा हाफ बाह्याचा टीशर्ट व नेव्ही ब्लु रंगाची हाफ पॅन्ट तसेच कमरेस काळ्या रंगाचा करगोटा आहे. केस काळे व दाढी वाढलेली आहे या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी कर्मांक ०२२-२७४५२३३३ किंवा सहा. पोलीस निरीक्षक सुषमा पाटील यांच्याशी संपर्क साधावा.
Tags
पनवेल