रस्ता सुरक्षा अभियान 2024 चे अनुषंगाने पनवेल शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमासंदर्भात जनजागृती अभियानरस्ता सुरक्षा अभियान 2024 चे अनुषंगाने पनवेल शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमासंदर्भात जनजागृती अभियान
पनवेल दि. ०२ ( वार्ताहर ) : रस्ता सुरक्षा अभियान 2024 चे अनुषंगाने पनवेल शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमासंदर्भात जनजागृती अभियान पनवेलमध्ये राबवण्यात आले.           यामध्ये पनवेल शहर हद्दीत नवीन पनवेल सिग्नल ,ओरियन मॉल , छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल रेल्वे स्टेशन येथे छोटा पोलीस ,यमराज, दारू बॉटल यासारखे मॉस्केट द्वारे हेल्मेट न घालणे सिग्नल जम्प न करणे, सीट बेल्ट लावणे, मद्यपाशन करून वाहन न चालवणे इ . वाहतूक नियमाचे पालन करणेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील,पोलीस उपनिरीक्षक महाडिक , पंधरे निकम , शेरखाने व पनवेल वाहतूक शाखेचे कर्मचारी हजर होते. 


थोडे नवीन जरा जुने