पनवेल मध्ये वास्तव्यास असलेल्या आरोपीच्या घराला लावल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी नोटिसा






पनवेल मध्ये वास्तव्यास असलेल्या आरोपीच्या घराला लावल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी नोटिसा 
पनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : आपल्या पत्नीच्या कुटूंबीयांकडून हुंडा घेतल्या प्रकरणी पसार झालेला व त्यानंतर पनवेल येथे वास्तव्यास असलेल्या आरोपीच्या घराला उत्तर प्रदेश पोलिसांनी मा . न्यायालयाच्या आदेशाने नोटिसा लावण्यात आल्या आहेत . तसेच रेल्वे स्टेशन व शासकीय इमारती वर सुद्धा अश्या प्रकारच्या नोटीसा लावण्यात आल्या आहेत. 



               आरोपी देवीप्रसाद पण्डा हा पनवेल शहरातील जेएनपीटी मार्गावरील ११०३ जोडिका मॅरेथॉन मेन्स जॉन येथे वास्तव्यास असून सदर ठिकाणी उत्तर प्रदेश येथील पोलीस गेल्या असता तेथे तो मिळून न आल्याने मा. न्यायालय सीजीएम भदोही उत्तर प्रदेश यांच्या आदेशानुसार ८२ सीआरपीसी च्या नोटीसा चिटकवण्यात आल्या आहेत . तश्याच प्रकारे एक नोटीस पनवेल रेल्वे स्टेशन व एक नोटीस तहसीलदार कार्यालय परिसर येथे पनवेल शहर पोलिसांच्या मदतीने चिटकवण्यात आल्या आहे . सदर नोटिसी मध्ये एक महिन्याचा आत मा. न्यायालय येथे सदर आरोपी उपस्थित राहिला नाही तर त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई होईल , २०२३ मधील घटनेत गोपीगंज कोतवाली जनपद भदोही उत्तर प्रदेश येथे तक्रार दाखल करण्यात आली होती . यावेळी आरोपी देवीप्रसाद पण्डा हा त्या वेळे पासून फरार होता . त्याला अटक करण्यासाठी काही महिन्यापासून मा. न्यायालय येथे कुर्की कारवाई करण्यासाठी प्रार्थनापत्र देण्यात आले होते . त्यानुसार मा.न्यायालयाने धारा ८२ सीआरपीसी ची नोटीस जाहीर केली होती . त्यानुसार उत्तरप्रदेश पोलिसांनी पनवेल येथील तीन वेगवेगळ्या ठिकाणी नोटीसा लावून सदर आरोपी एक महिन्याचा आत मा. न्यायालय येथे सदर आरोपी उपस्थित राहिला नाही तर त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई होईल असे सांगितले आहे . 


थोडे नवीन जरा जुने