तालुका विधी सेवा समिती, पनवेल , बार असोसिएशन, पनवेल आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने 34 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कार्यशाळेचे प्रबोधन




पनवेल दि. १५ ( संजय कदम ) : तालुका विधी सेवा समिती, पनवेल , बार असोसिएशन, पनवेल आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने 34 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कार्यशाळेचे प्रबोधन चांगू काना ठाकूर महाविद्यालय, पनवेल येथे आज करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान पनवेल जिल्हा न्यायाधीश मा. शिंदे यांनी भूषविले .


 
                   गती मती आणि नीती याचं भान ठेऊन तरुणाईने पुढे वाटचाल करावी. या आशियाचे मनोगत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. सह दिवाणी न्यायाधीश मा. सोनवणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या ओघवत्या वाणीने मंत्रमुग्ध केले. महाविद्यालयाच्या माध्यमातून लागणाऱ्या जनजागृतीच्या अभियाना संदर्भात महाविद्यालयातर्फे सर्व ते सहकार्य केले जाईल अशा स्वरूपाचे मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर यांनी व्यक्त केले. अनावधानाने जरी अपघात घडला तरी समोरच्या व्यक्तीला सर्वतोपरी मदत करण्याची भावना आपल्यात कायम राहिली पाहिजे. या आशयाच मनोगत उपस्थितांना बार असोसिएशन पनवेल चे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ यांनी केले




. प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांनी अतिशय उत्तम पद्धतीने विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने अपघात टाळण्यासाठी कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.एल.व्ही. शैलेश कोंडस्कर यांनी केली.याप्रसंगी वकील संघटनेचे खजिनदार ॲड. धनराज तोकडे, ऑडिटर ॲड. विशाल मुंडकर , कार्यकारिणी सदस्य ॲड. अमित पाटील, कार्यकारिणी सदस्य ॲड.छाया म्हात्रे, वरिष्ठ लिपिक सुजाता महाडिक, रिटेनर लॉयर ॲड. सुयश कामेरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
फोटो - कार्यशाळेचे प्रबोधन
थोडे नवीन जरा जुने