नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पदाचा विवेक पानसरे यांनी स्वीकारला पदभार






नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पदाचा विवेक पानसरे यांनी स्वीकारला पदभार
पनवेल दि.०६ (संजय कदम): नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पदाचा विवेक पानसरे यांनी आज पदभार स्वीकारला आहे.



              आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आल्या. त्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ १ मध्ये कार्यरत असणारे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची बदली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ २ येथे करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी आज आपल्या पदाचा पदभार पनवेल येथे येऊन स्वीकारला आहे. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ २ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची बदली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ १ येथे करण्यात आली आहे.



 पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर त्वरित सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बैठक घेऊन येथील गुन्हेगारी, राजकीय व इतर विषयांतील दाखल होणाऱ्या गुन्ह्यांसंदर्भात आढावा घेतला आहे.विवेक पानसरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ १ येथे आपल्या कामाचा चांगलाच ठसा उमटवीत मोठं मोठ्या गुन्ह्यांची उकल त्यांच्या कार्यकाळात झाली असल्याने व अत्यंत शिस्तप्रिय व्यक्तिमत्व असल्याने आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये परीमंडळ २ येथे सुद्धा ते आपल्या कामाचा ठसा उमटवतील अशी नागरिकांची आशा आहे. 


थोडे नवीन जरा जुने