कमळ महिला पतपेढी हळदी-कुंकू समारंभ मोठया उत्साहात साजरा







कमळ महिला पतपेढी हळदी-कुंकू समारंभ मोठया उत्साहात साजरा
पनवेल दि.०६ (वार्ताहर): कमळ महिला नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, पनवेल संस्था महिलांसाठी नेहमीच विविध उपक्रम उत्साहाने राबवित असते. या वर्षीही मकर संक्रांती निमित्त "हळदी-कुंकू समारंभ" कमळ महिला नागरी सहकारी पतपेढी (म) पनवेल कर्मचारी प्रशिक्षण केंद्र, पहिला मजला, जय भारत नाका, पनवेल येथे आयोजित करण्यात आला. 



              समारंभाच्या सुरवातीला संस्थेच्या संचालिका पूर्वा खेडेकर यांनी हळदी-कुंकुवासाठी आलेल्या सर्व महिला सभासदांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकेत हळदी-कुंकू समारंभाची महती याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर संस्थेच्या संचालिका मनिषा विसपूते यांनी संस्थेबद्दलची माहिती तसेच संस्थेने सुरू केलेल्या नविन विशेष ठेव योजनेबाबत अतिशय प्रभावीपणे माहिती उपस्थित महिला सभासदांना सांगितली. त्याला महिला सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळाला. संस्थेच्या संचालिका निर्मला म्हात्रे यांनी हळदी-कुंकू समारंभावर मार्गदर्शन करून महिलांनी आपल्या संस्थेच्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा तसेच हळदी-कुंकू समारंभाबाबत माहिती सांगितली. त्यानंतर संचालिकांनी उपस्थित महिलांना हळदी-कुंकू, वाण दिले. 



यावेळेस जवळ जवळ ३०० महिला सभासदांनी उपस्थिती दर्शविली. मोठ्या उत्साहात आणि खेळोमेळीच्या वातावरणात हळदी-कुंकू समारंभ सोहळा संपन्न झाला. महिलांची उपस्थिती बघता खरोखरच महिलांना त्यांच्या पतसंस्थेबद्दल वाटत असलेले ममत्व, वाटत असलेला अभिमान आणि संस्थेच्या दैनंदिन कामकाजात असलेला सहभाग दिसून येत होता. कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या अध्यक्षा मालती आंग्रे, संस्थेच्या संचालिका अर्चना कुळकर्णी, चित्रा मानकामे, सुषमा जांभळे तसेच संस्थेच्या महिला कर्मचारी वर्गाने उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.


थोडे नवीन जरा जुने