मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी तत्परतेने ड्रेनेज लाईनचा विषय लागला मार्गी





मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी तत्परतेने ड्रेनेज लाईनचा विषय लागला मार्गी
पनवेल दि.०६ (संजय कदम): पनवेल शहरातील प्रभाग क्र १८ मधील प्रभागतील शांताबाई गडगे मार्गावरील मलनिसरण करणारी लाईन तुटलेल्यामुळे परिसरातील सोसायट्यांना त्रास होत होता. या समस्येची दाखल घेत मा. उपमहापौर विक्रांत पाटील यांनी त्वरित ही समस्या सोडवून नागरिकांना दिलासा दिला आहे.



              प्रभागतील शांताबाई गडगे मार्गावरील मलनिसरण करणारी लाईन तुटलेल्यामुळे परिसरातील सोसायट्यांना त्रास होऊ लागला होता. पाईप तुटल्यामुळे मलनिसरण होत नव्हते, त्यामुळें दुर्गंधी युक्त पाणी उलट फिरत असल्यामुळे तळमजल्यावरील राहणाऱ्या लोकांनी जास्त त्रास जाणवत होता.याबाबत सोसायटींच्या रहिवाशांनी कार्यक्षम मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी त्यांच्या जनसेवा कार्यालयात भेट घेतली आणि विषयाची माहिती दिली. विक्रांत पाटील यांनी त्वरित महानगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयात पत्र दिले. रहिवाशांच्या आरोग्याचा विषय असल्यामुळे विक्रांत पाटील यांनी सतत पाठपुरावा करून आणि स्वतः जातीने उभे राहून कामास सुरवात करून घेतली. मा.नगरसेवक विक्रांत पाटील माझा प्रभाग माझा परिवार या अनुषंगाने नेहमीच प्रभागतील समस्या सोडवण्यास तत्पर असतात. याबाबत प्रभागतील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.


थोडे नवीन जरा जुने