बंद घरातील घरफोडीच्या हजारो किमतीचा ऐवज लंपास






बंद घरातील घरफोडीच्या हजारो किमतीचा ऐवज लंपास
पनवेल दि.०६ (वार्ताहर): एका बंद घरात केलेल्या घरफोडीत हजारो रुपये किमतीचा ऐवज लंपास झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील वावंजे गावाच्या हद्दीत घडली आहे.



            येथे बंद असलेल्या घराच्या दरवाज्याचे लॉक अज्ञात चोरट्याने कश्याने तरी उघडून त्याद्वारे आत प्रवेश करून घरातील विविध वस्तू, कॉम्पुटर, प्रिंटर, लोखंडी प्लेट असा मिळून जवळपास ५४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने