गुन्हे शाखा कक्ष १ ने केलेल्या धडक कारवाईत वाहन चोरीच्या १९ गुन्ह्यातील आरोपींना केली अटक; वाहन चोरीचे ८ गुन्हे उघडकीस








पनवेल दि.०७ (संजय कदम): पोलीस आयुक्तालय नवी मुंबई येथील गुन्हे शाखा कक्ष १ ने केलेल्या धडक कारवाईत वाहन चोरीच्या १९ गुन्ह्यातील आरोपींना अटक केली असून ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
               पोलीस आयुक्तालय परिसरात रबाळे पोलीस ठाणे हददीत मारूती सुझुकी ब्रिझा कार तसेच मारूती ईको कार चोरी झालेबाबत अनुक्रमे रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात मोटार कार चोरीचे प्रमाण वाढल्याने आरोपींचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भांरबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे यांनी तपासा संबंधी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. तसेच पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमित काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) गजानन राठोड, यांनी घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावा, तांत्रिक पुरावा व गुन्हयातील आरोपी येण्याचे व जाण्याचे मार्ग इत्यादी बाबत तपास करून गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणावा याकरीता मार्गदर्शक सुचना देवुन तपास करणेबाबत आदेशीत केल्याने गुन्हे शाखा, कक्ष-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील





, सहा. पोलीस निरीक्षक निलेश पाटील, सहा. पोलीस निरीक्षक निलेश बनकर, सहा. पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, पो.उप.नि. सचिन बाराते, पो.उप.नि. नरेंद्र पाटील, पो. उप.नि. प्रशांत कुंभार, पोहवा अशोक खैरे, पोहवा विश्वास पवार, पोहवा सुंमत बांगर, पोहवा बालाजी चव्हाण, पोहवा दिपक पाटील, पोहवा आतिष कदम, पोहवा अजय वाघ, पोहवा लक्ष्मण कोपरकर, पोहवा दिपक मोरे, पोहवा निलेश पांचाळ, पोना रविंद्र सानप, पोकॉ विशाल सावरकर, सहा. पो.उप. निरीक्षक उदय म्हात्रे, चालक पोकॉ विश्वास भोईर आदींच्या पथकाने गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला असता घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून तपास करून गुन्हयातील आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मोहम्मद फैज अकबर अली शेख, रा. मेरठ व त्याचे साथीदारांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाल्याने वपोनि. आबासाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. निलेश पाटील व पथक असे मेरठ, उत्तरप्रदेश येथे रवाना होवून स्थानिक पोलीसांची मदत देवून रबाळे पोलीस ठाणे गुन्हयात आरोपी नामे मोहम्मद फैज अकबर अली शेख, रा. मेरठ, उत्तरप्रदेश यास शिताफीने ताब्यात घेवून अटक केली.




 तसेच आरोपी नामे मोहम्मद शमीम मो. शफी शेख वय ३५ वर्षे रा. साकीनाका मुंबई यास साकीनाका, मुंबई परिसरातून अटक केली. त्यानंतर नमूद आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता अटक आरोपी यांनी इतर ०२ पाहीजे आरोपींच्या मदतीने जानेवारी २०२४ मध्ये नवी मुंबई, मुंबई व ठाणे पसिरात मोटार कार चोरीचे एकुण ०५ गुन्हे केल्याचे कबूल केले. गुन्हयाचे तपासात अटक आरोपी यांचेकडून एकूण १५,००,०००/-रू किमंतीच्या मारूती सुझुकी ब्रिझा कार, मारूती सुझुकी इरटिगा कार, मारूती ईको कार अशा एकुण ०३ मोटार कार जप्त करण्यात आल्या तसेच गुन्हयाचे तपासात यातील अटक आरोपी हे चोरी केलेली मारूती सुझुकी ब्रिझा कार चालवित घेवून जात असताना त्यांनी अहमदनगर तालुका पोलीस ठाणे हददीत एका मोटार सायकलवरील इसमास कारने धडक देवून अपघात केला. सदर अपघातात एक इसम गंभीररित्या जखमी होवून मयत झाला असून आरोपी हे अपघात करून सदरची कार ही घटनास्थळी सोडून पळून गेले असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर घटनेबाबत अहमदनगर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’
सदर आरोपींकडून रबाळे पो. ठाण्यातील २ गुन्हे, समतानगर पो. ठाणे, कासारवडवली पो. ठाणे, मानपाडा पो. ठाणे, व अहमदनगर पोलीस ठाणे असे एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.


थोडे नवीन जरा जुने