कळंबोलीतील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुखसह कार्यकर्ते शिदेंच्या शिवसेनेत; पालकमंत्री उदय सामंत व खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा समावेश





पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कळंबोली येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख सचिन मोरे आणि महेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याबरोबर अविनाश केसकर, निलेश घुले आणि इतर शिवसैनिकांनी शिंदेंचा झेंडा हातात घेतला. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी त्यांचे स्वागत केले.




        लोकसभा निवडणुकीचे पडघम गेल्या काही दिवसांपासून वाजू लागले आहेत. लवकरच आचारसंहिता जाहीर होणार आहे. त्यानुसार जोरदार तयारी सुरू झाली आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक मतदार असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीने लोकसभेच्या पार्श्वभूमी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्ष या मतदारसंघांमध्ये मजबूत आहेच. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा गेल्या वर्ष दीड वर्षांमध्ये आपली पाले मुळे रुजवली आहेत. पक्षांमध्ये इन्कमिंग सुरूच असून कळंबोली मध्ये जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला धक्का दिला आहे. या पक्षाचे कळंबोली उपशहर प्रमुख सचिन मोरे, आणि महेंद्र पवार यांनी गुरुवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. याशिवाय उपमहागर संघटक संजय सावंत, शाखाप्रमुख निलेश घुले, हनुमंत ताम्हणकर, रवींद्रनाथ राणे' दिनेश शर्मा, अविनाश केसकर, आदिनाथ जायभाय, तसेच उपशाखाप्रमुख साईस मुळीक यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर संदेश वाघमारे आणि तुषार चौधरी यांचेही पालकमंत्री व खासदारांनी स्वागत केले




. यावेळी शिवसेनेचे पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महानगर संघटक मंगेश रानवडे, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, संजय शेडगे, महेश गोडसे, निलेश डिसले यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना आपल्या पक्षामध्ये सन्मान केला जाईल. त्यांना जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या जातील अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.


थोडे नवीन जरा जुने