श्री गुरु लिंगेश्वर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


पनवेल दि.०७ (संजय कदम): तक्का येथील श्री गुरु लिंगेश्वर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले असून या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीचे रायगड जिल्ह्याचे नेते महेश साळुंखे यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.            पनवेल तालुक्यातील तक्का येथे श्री गुरु लिंगेश्वर प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आंबेडकरी चळवळीचे नेते महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी इतर अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी विद्यार्थी वर्ग शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने