21 जून रोजी वटपौर्णिमा आहे. त्यानिमित्त गृहिणी वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मिळावे ही प्रार्थना करतात. घरामध्ये पूजन करते वेळी सदर वृक्षाची तोड करून वृक्षहानी ही मोठ्या प्रमाणात होते या गोष्टी लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उलवे मधील भगिनींसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने वडाचे छोटे रोपटे पूजनासाठी सोसायटी आणि सोसायटीच्या परिसरांमध्ये भेट म्हणून देण्याचा उपक्रम वटपौर्णिमेनिमित्त राबवण्यात आला
भगिनींना आपल्या इमारतीच्या आवारातच सोसायट्यांमध्ये सदर रोपे देऊन पूजन करण्यासाठी आमच्याकडून एक पाऊल उचलण्यात आले आहे असे विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले. या उपक्रमात आम्ही उलवेकर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सदर रोपटे विविध ठिकाणी महिलांना भेट दिले.
Tags
पनवेल