इनरव्हील क्लब ऑफ पनवेलचा स्तुत्य उपक्रम...

कामोठे (4KNews) समाजसेवी उपक्रमात अग्रगण्य असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ पनवेल या संस्थेतर्फे पनवेल जवळील तळोजा कारागृहात कैद्यांना इनरव्हील च्या मेंबर्सनी राखी बांधून तसेच २०० पुस्तक तळोजा जेलच्या लायब्ररी साठी दिले. त्यांच्या जीवनातील भाऊ बहिणीच्या सणाचे पावित्र्य राखून आनंद निर्माण केला. 

         क्लबच्या मेंबर ऍडव्होकेट संगीता रोकडे यांनी या संबंधात कारागृह प्रशासनाची परवानगी काढण्याचे महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. त्यामुळे क्लबच्या १२ मेंबर्स ना प्रवेश घेता आला. क्लब प्रेसिडेंट डॉक्टर विना मनोहर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून दोनशे भावांना आनंद मिळवून दिला. यानंतर इनरव्हील क्लब मेंबर ऍडव्होकेट सुनीता जोशी यांनी कारागृहातील कैद्यांशी संवाद साधला. विविध पौराणिक आणि ऐतिहासिक उदाहरणे देत देत त्याचा आपल्या आजच्या जीवनाशी संबंध जोडून जे आहे ते स्वीकारून आनंदाने जगावे याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले. टाचणी पडली तरी आवाज होईल एवढी शांतता सभागृहात पसरली होती . सर्व श्रोते ऐकत होते अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. अशा प्रकारे इनरव्हील क्लब ऑफ पनवेलने हा जिव्हाळ्याचा प्रसंग साजरा करून समाजापुढे एक आदर्श ठेवला यात शंका नाही. इनरव्हील क्लब ऑफ पनवेलचा हा उपक्रम गेली दोन वर्ष सातत्याने सुरू आहे.


प्रमोद. बी .वाघ अधीक्षक तळोजा मध्यवर्ती कारागृह, गोविंद .के .राठोड अति अधिक्षक, महादेव. एस .पवार उपअधीक्षक, जितेंद्र ए काळे उपअधीक्षक, राहुल बी झुटाळे वरिष्ठ तुरुंगाधिकारी, सुनील पाटील, देवराव जाधव आणि गणेश मानकर हे सर्व तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधिकारी कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित होते व इनरव्हीलच्या सभासदांनी या सर्वांना राख्या बांधल्या. यामध्ये डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉक्टर वीणा मनोहर प्रेसिडेंट ऑफ इनरव्हील क्लब ऑफ पनवेल, वंदना लघाटे व्हाईस प्रेसिडेंट, संयोगिता बापट आयपीपी, अंजली कुलकर्णी सेक्रेटरी, मंजिरी नांदेडकर खजिनदार, संगीता रोकडे, संजीवनी मालवणकर, सुनिता जोशी, सुलभा निंबाळकर,अनिता शेट्टये, निवेदिता चौधरी या सर्व सभासद उपस्थित होत्या.

थोडे नवीन जरा जुने