भाजपच्या दहीहंडीने उलवा नोडमध्ये जल्लोष...

कामोठे (4KNews) भारतीय जनता पक्ष आणि महिला मोर्चा उलवे नोड यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शानदारपणे साजरा झाला. ही हंडी फोडण्याचा मान मारलेश्वर महिला मंडळ मुंबई आणि वडाळा येथील आई एकवीरा मंडळ या पथकाने पटकाविला असून त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती ठरली असून तब्बल ६ लाख ६६ हजार ६६६ रुपयांची ही हंडी होती मात्र त्याहून अधिक रक्कमेची पारितोषिके दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गोवींदा पथकांना देऊन त्यांना प्रोत्साहित केले.
         उलवेनोड सेक्टर ९ मधील खारकोपर तलावाच्या बाजूला असलेल्या मैदानात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. या ठिकाणी अनेक पथकांनी मानवी मनोरे रचून सलामी दिली. यावेळी प्रत्येक सलामी दिलेल्या पथकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीसे देऊन गौरवण्यात आले. या दहीहंडी उत्सवामध्ये यंगस्टार म्युझिकलच्यावतीने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने अधिक रंगत आली. यावेळी महिलांच्या हंडीमध्ये मुंबईतील मारलेश्वर महिला मंडळ तर पुरुषांच्या हंडीमध्ये वडाळा येथील आई एकविरा मंडळ या गोवींदा पथकाला ही हंडी फोडण्याचा मान मिळवला. 
त्यांना बक्षीस आणि ट्रॉफी देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरवण्यात आले. यावेळी येष्ठ नेते वाय टी देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, योगिता भगत, कोळी समाजाचे नेते विश्वनाथ कोळी, वहाळ ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम कोळी, रतनशेठ भगत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, हेमंत ठाकूर, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, भाजपचे उलवे नोड १ चे अध्यक्ष निलेश खारकर, मदन पाटील, शैलेश भगत, साईचरण म्हात्रे, सुजाता पाटील, कामीनी कोळी, उषा देशमुख, निकिता खारकर, भार्गव ठाकूर, वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य वितेश पाटील, अंकुश ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने