लाडक्या बहीणींना मिळणार महिना 2 हजार रुपये


महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. यात पात्र महिलेला महिना 1500 रुपये मिळतात. त्यातच महाविकास आघाडीही लाडक्या बहीणींसाठी सरसावली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना 2 हजार रुपये महिना देण्यात येणार आहेत.
 मविआच्या जाहीरनामा समितीकडून याबाबत निर्णय देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मविआचे सरकार आल्यास विधिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत या योजनेबाबतचा ठराव मांडण्यात येणार आहे. दरम्यान, येत्या 2 दिवसात मविआ आपला जाहीरनामा सादर करण्याची शक्यता आहे.
थोडे नवीन जरा जुने