महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत 7 हजार 995 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांनी 10 हजार 905 अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली आहे.
आज अर्जाची छाननी केली जाणार आहे. तर 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार आहेत. या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावं स्पष्ट होतील, महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
Tags
महाराष्ट्र