पनवेल बसस्थानकात एसटीत चढत असताना ६० वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी अनोळखी चोराविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्पा धनावत ह्या रसायनी, खालापूर येथे राहत असून त्या व त्यांचे पती चष्मा दुरुस्त करण्यासाठी रसायनी येथून एसटीने पनवेल येथे आल्या होत्या. ओरियन मॉल येथे चष्याचे काम करून दोघे रसायनीला जाण्यासाठी दुपारी एसटी स्टँडवर आल्या. नंतर वाशिवली येथे जाणाऱ्या एसटीत चढत असताना प्रवाशांची गर्दी होती. गर्दीचा फायदा घेत त्यांचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले.
Tags
पनवेल