महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेतून शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. संभाजी ब्रिगेडने युती तोडण्याची घोषणा केली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज साखरे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत योग्य जागा मिळाल्या नाहीत,
त्यामुळे त्यांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून 5 ते 6 जागा देण्याचे आश्वासन मिळाले होते,
पण सध्याच्या परिस्थितीत एकही जागा दिली जात नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वतंत्रपणे 50 जागा लढणार आहे.
Tags
मुंबई