लोहा मतदारसंघाचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंद अंतरवली सराटी गावात मनोज जरांगेंच्या भेटीला गेल्या आहेत. आशा शिंदे लोहा मतदारसंघातून शेकापकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
या मतदारसंघात अजित पवार गटाकडून आशा शिंदे यांचे बंधू, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर उमेदवार आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लोहा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून शेकापसमोर पेच निर्माण झाला आहे.
Tags
लोहा